लोकनेता न्युज नेटवर्क
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर व नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली 8 मार्च रोजी शिवसेना नांदेड दक्षिण गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सिडको येथील संपर्क कार्यालय येथे शिवसेना ऊबाठा गटाचे माजी नगरसेवक राजू कुलथे, सिडको महिला शिवसेना शहरप्रमुख स्मिता कुलकर्णी,हडको शहरप्रमुख बजरंग ठाकूर,संजय गांधी निराधार योजना नांदेडचे सदस्य कृष्णा पांचाळ, ऊपशहरप्रमुख आंनद सरोदे, दिपक देशपांडे, संतोष खैरे,रिंकु सावळे,केरबा कराड, यांनी नांदेड दक्षिण विधानसभा आमदार आनंदराव पाटील बोढारकर व जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षांत प्रवेश केला, यावेळी शिवसेनेचे दस्ती व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले ,व जय भवानी जय शिवाजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आगे-बढो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी नांदेड दक्षिण प्रमुख विनय पाटील गिरडे,तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, शिवसेना शहरप्रमुख सुहास पाटील खराणे,पप्पू गायकवाड,दशरथ कंधारे यांच्या सह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या पक्षप्रवेश मुळे नवीन नांदेड भागातील शिवसेना शिंदे गटाचे प्राबल्य वाढले आहे.
_________________________
Post a Comment