गोळेगाव :- केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या गेल्या दहा वर्षांपासून सक्षम पदाधिकारी म्हणून सातत्याने सामाजिक सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या ॲड. रेखा हणमंते, चिखली यांना संगठन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांनी संविधान गौरव पुरस्कार २०२५ जाहीर करून त्यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र प्रदान करून त्यांना त्यांचे पती तथा सामाजिक व साहित्यिक तथा संवैधानिक सेवेसाठी साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांच्यासह गौरवान्वित करण्यात आले. गेल्या अर्ध्या शतकापेक्षा जास्त सामाजिक क्षेत्रात सेवाभावी कार्यास्तव विविध पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आले असून हा त्यांचा बहुमान ठरला आहे. सदर पुरस्कार त्यांना संगठन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले, राष्ट्रीय संगठन सचिव डॉ. बबनराव महामुने, छत्रपती संभाजीनगर, उपाध्यक्ष बशीर शेख, मुंबई, नवनिर्वाचित विशेष उपाध्यक्ष आयु. रविंद्र काशिनाथ सोनार,
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून सर्व स्तरांमधून त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
________________________
Post a Comment