केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली ची हॅटट्रिक - जनप्रबोधनाच्या गायन तथा वादन साधक पत्नी व पतीस एकाच मंडपी पुरस्कार !

लोकनेता न्युज नेटवर्क
 

सावरगाव डुकरे :महाराष्ट्र राज्याच्या संस्थापने दरम्यानच्या काळात पुरोगामीत्व तथा प्रगतीशीलतेचा व राष्ट्रीयतेचा नवाच वारसा निर्माण करणारे तत्कालीन, फुले - आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते मां. संतोषराव डुकरे पाटील यांनी व त्यांच्या सहकारी मंडळींनी घडविलेल्या सकारात्मक बदलामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पटलावर राज्यातील पहीले आदर्श गाव म्हणून शासनाचा पुरस्कार मिळविणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील छोटेसे गाव म्हणजे मौजे सावरगाव डुकरे येथील, पुन्हा एकदा, फुले - आंबेडकरी विचारांचा वारसा भजनी मंडळाच्या गायन व वादनाच्या माध्यमातून चालविणाऱ्या सौ.अलका व विजय डुकरे पाटील या तरुण कलावंत जोडीने साठ वर्षांनंतर पुनश्च एकदा गावाच्या वैभवशाली शीरपेचात दोन गौरवशाली पुरस्कारांचे तुरे खोवले.
या दाम्पत्याने गावच्या तथा विविध ठिकाणच्या व विशेषत: पंचशील भजनी मंडळ, चिखली, जि. बुलढाणा च्या वतीने शेकडो प्रबोधन कार्यक्रमाद्वारे सामाजिक व संवैधानिक चळवळीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल, केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली तर्फे त्यांना उभयतांना प्रत्येकी, संविधान गौरव पुरस्कार - २०२५ हा अत्यंत बहुमानाचा पुरस्कार दि. १५-०३-२०२५ रोजी मौजे गोळेगाव, ता. बोदवड, जि. जळगाव, पू. खा. जवळील श्री. गजानन महाराज संस्थान मंदीराच्या आकर्षक उद्यानात संगठनच्या आयोजित प्रादेशिक अधिवेशन तथा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये संगठनचे माननीय अध्यक्ष, डॉ. मिलिंद दहिवले, राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. बबनराव महामुने छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, राज्य पदाधिकारी डॉ. पंकज इंगळे, जळगाव, नवनिर्वाचित राज्य विशेष उपाध्यक्ष मां. रविंद्र काशिनाथ सोनार, गोळेगाव, डॉ. अमरकुमार तायडे, बुलढाणा जिल्हा नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. डी. व्ही. खरात सर, चिखली इ. मान्यवरांच्या हस्ते, प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
त्यानिमित्ताने त्यांचे सर्व नागरिकांच्या वतीने अभिनंदन होत असताना, हा केवळ आमचा नसून सबंध गावाचाच सन्मान असल्याचे विधान सौ. अलका विजय डुकरे पाटील यांनी केले.
________________________

0/Post a Comment/Comments