लोकनेता न्युज नेटवर्क
हिवरा आश्रम :- नुकतेच अंतर्राष्ट्रीय स्तरावर आपल्या सक्षम कारकिर्दीचा ठसा उमटविणारे केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली चे प्रादेशिक अधिवेशन मौजे गोळेगाव, ता. बोदवड, जि. जळगाव, पू. खा. येथे दि. १५ मार्च, २०२५ रोजी संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले असून त्याच सोहळ्याचे औचित्य साधून संगठनच्या वतीने पुरस्कार वितरण सुध्दा पार पडले. सदर कार्यक्रमात महाराष्ट्रभर ख्याती प्राप्त विवेकानंद आश्रम चे शाहीर इश्वर मगर यांच्या मानवीय शाहीरी प्रबोधनाची दखल घेऊन केंद्रीय मानवाधिकार संगठन च्या तर्फे संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले, राष्ट्रीय संघटन सचिव तथा साहित्यिक सेवाभावी व वैशिष्ठ्यपूर्ण कथाकधनासाठी अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. बबनराव महामुने, छत्रपती संभाजीनगर तथा उपाध्यक्ष बशीर शेख, मुंबई या मान्यवरांच्या हस्ते, त्यांना संविधान गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉ. डी. व्ही. खरात सर, महाराष्ट्र राज्य विशेष उपाध्यक्ष मा. रविंद्र काशिनाथ सोनार, गोळेगाव, डॉ. पंकज इंगळे तसेच डॉ. अमरकुमार तायडे इ.ची उपस्थिती होती.
________________________
Post a Comment