कलकत्ता काव्य महोत्सव २०२५ मध्ये बुलढाणा जिल्ह्याची गगन भरारी.....!

लोकनेता न्युज नेटवर्क

कलकत्ता - जागतिक कविता दिवसाचे औचित्य साधून राममोहन - विद्यासागर ॲकॅडेमी वेस्ट बेंगाल तथा जी.एच्.आर.पी.एफ् ॲन्ड रिसर्च सेंटर आणि क्रिष्टी पठार आसाम तसेच सहेली सपथ वेस्ट बेंगाल सह कवि महल वेस्ट बेंगाल या सर्व मानवीय सेवाभावी, साहित्यिक व सामाजिक तथा शैक्षणिक व संवैधानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. २० मार्च ते २४ मार्च या पंचदिवसीय कलकत्ता काव्य महोत्सव २०२५ मधे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधिज्ञ तसेच बहुजन साहित्य संघ, चिखली चे अध्यक्ष साहित्यिक, कवी आणि हरहुन्नरी कलावंत डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र यांना विशेष अतिथी या नात्याने निमंत्रित करण्यात येवून बहुमानाच्या इश्वरचंद्र विद्यासागर व राजा राममोहन रॉय पुरस्कार तसेच आलोक बॅनर्जी मेमोरियल ॲवॉर्ड हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर सामाजिक सेवेसाठी साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त कवी डॉ. डी. व्ही. खरात, चिखली , बुलढाणा यांना ( ज्यांनी वंदेमातरम हे गीत लिहिलेले आहे, त्यांच्या नांवे अर्थात ) बंकिमचंद्र चटर्जी पुरस्कार तथा वैशिष्ठ्यपूर्ण कथाकथनासाठी ज्यांना अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान झालेली आहे असे ज्येष्ठ साहित्यिक व कवी कथाकार यांना स्वामी रामकृष्ण परमहंस पुरस्काराने आणि भावकवी अंकुश पडघान बोरगाव काकडे, चिखली, बुलढाणा यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान करून जीएच आरपीएफचे अध्यक्ष तथा या महोत्सवाचे आयोजक मा. महानंदा सरकार व संयोजक मा. सुनील चक्रबोर्ती तथा नेपाळ, भारत व इतर देश विदेशातील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वांनी आपापल्या परीने विविध भाषेतील कविता, गीत, कथा यांचे प्रभावी सादरीकरण करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. या अविस्मरणीय सोहळ्यात मां.ओशोककुमार चोक्रोबोर्ती, बरूण चोक्रोबोर्ती, ब्रिगेडीयर टी. के. मुखर्जी, वेस्ट बेंगाल, दीपम दत्ता, आसाम, बिश्वोजित बोंडोपाध्याय, वेस्ट बेंगाल, तुसार कांती, मलायलाह बिश्वोभारती, वेस्ट बेंगाल आणि डॉ. चिरूमणी, बाल नृत्य कलावंत तथा ज्युडो चॅम्पियन, चित्रकार, गायिका तसेच पुरस्कार प्राप्त कु. सौमिली दास सह दुसरी बाल नृत्य कलावंत कु. क्रित्तिका इत्यादी साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
________________________

0/Post a Comment/Comments