एरंडोल: दि.३१ मार्च २०२५ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे एक दिवसीय बहुजन साहित्य संमेलनाचे आयोजन बहुजन साहित्य संघ चिखली यांनी केले असून या संमेलनात कथाकथन,परिसंवाद,कविसंमेलन या विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवरांचे कवी संमेलन संपन्न होत असून कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी एरंडोल जि. जळगाव येथील कवी तथा व्याख्याते प्रा.वा. ना.आंधळे यांची निवड बहुजन साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय.बहुजन संघाचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.विजयकुमार कस्तुरे व संमेलन संयोजक तथा दै.लोकनेताचे संपादक श्री.ज्ञानेश्वर बुधवंत यांनी या निवडीबाबतचे निमंत्रण पत्र नुकतेच प्रा.आंधळे यांना पाठविले आहे.
प्रा.आंधळे गेल्या चार दशकांपासून काव्यलेखन करीत असून आजवर पाच राज्यस्तरीय साहित्य संमेलनात कवी संमेलनाचे अध्यक्षपदासह तीन राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.विविध शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत.सदर साहित्य संमेलनात महाराष्ट्रभरातून कवी लेखक साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आलेले असून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.गणेश गायकवाड यांची निवड करण्यात आलीय.तर केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांचे शुभहस्ते संमेलनाचे उदघाटन संपन्न होत आहे.स्वागताध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.संघर्ष सावळे यांची निवड करण्यात आलीय.प्रा.आंधळे यांच्या या यशदायी वाटचालीचे व निवडीचे त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदन होत आहे.
________________________
Post a Comment