चिखली : दि. ०८ बहुजन साहित्य संघ चिखली चे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व कवी तथा सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजयकुमार कस्तुरे तथा सचिव डॉ. डी. व्ही. खरात सर, चिखली यांनी चिखली नगर पालिकेचे माजी अध्यक्ष मा. सुरेशआप्पा खबुतरे यांनी नुकत्याच, मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतील दि. ३१-०३-२०२५ रोजी संपन्न झालेल्या बहुजन साहित्य संमेलन सोहळ्यामधे सहभागी होण्यासाठी आलेल्या तसेच सामाजिक प्रबोधन व सेवा तथा फुले -आंबेडकरी चळवळीत दिलेल्या समर्पित योगदानास्तव, या संमेलनात ब. सा. संघाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या फुले -शाहू-आंबेडकर पुरस्काराचे पुरस्कारार्थी म्हणून निमंत्रित, मा जिजाऊ च्या लेकींना नवूवारी पैठणींची सप्रेम भेट देण्यासाठी, केलेल्या मोलाच्या सहकार्य व योगदानासाठी, मां. सुरेशआप्पा खबुतरे यांना मानाचा फेटा चढवून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र तथा पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांच्या सेवा कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला व हार्दिक आभार मानले. यावेळी, भविष्यात कसल्याही सामाजिक कार्यास आपले सहर्ष योगदान राहील, असे अभिवचनात्मक आश्वासन आप्पासाहेबांनी दिले.
________________________
Post a Comment