लोहा :- लोहा तालुक्यातील जोमेगांव रोड ते करमाळा आश्रमापर्यत जाणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून पि.डब्लू.डी. विभागाचे डिप्टी इंजिनिअर पवार व जेइ सोमवंशी या दोन अधिकाऱ्यांच्या व गुत्तेदार शुभम देशमुख आणि शिवराज बारूळकर यांच्या संगनमताने जोमेगांव - पिंपळदरी - करमाळा - हिंदोळा आश्रमा पर्यंत रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून अति निकृष्ट दर्जाचे काम होत आहे खडक मिश्रित गिट्टी वापरून रोड न साफ करता त्यावर डांबर कमी प्रमाणात टाकत आहेत.मोठ्या गिट्टीवर डांबर टाकून दबई न करता रस्त्याचे काम चालू आहे.साईडचा खडक डांबरामध्ये मिसळत आहे. अर्धा इंच सुद्धा डांबर टाकले जात नाही .तेव्हा नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कर्डीले साहेब यांनी जोमगांव रोड ते करमाळा आश्रमापर्यत होणाऱ्या रस्त्याच्या कामात लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर व गुत्तेदारावर कारवाई करावी तसेच ताबडतोब काम थांबवून शासनामार्फत या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करून देण्यात यावे.डिप्टी इंजिनिअर पिडब्लूडी जेई यांना कामाविषयी विचारले असता अरेरावी ची भाषा वापरतात.यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा दैनिक लोकनेता लोहा तालुका ग्रामीण प्रतिनिधी पत्रकार संतोष पाटील जाधव पिंपळदरीकर यांनी जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना दैनिक लोकनेता पेपर च्या माध्यमातून उपोषणाचा इशारा दिला आहे.
Post a Comment