चिखली :- दि. १७ येथील ज्येष्ठ विधिज्ञ तथा व्यवसायातील चौफेर व्याप्ती व महाराष्ट्रंच नव्हे तर विविध राज्यातील बहुतांश क्षेत्रातील न्यायालयात संबंधित खटल्यांनिमित्ताने अध्ययनशील मजल मारीत आज दि. १७-०४-२०२५ रोजी वकीलीतील अर्धे शतक अर्थात पन्नास वर्षे यशस्वीरित्या पार केल्याप्रित्यर्थ ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरे यांचा, स्थानिक चिखली तालुका वकील संघातर्फे हार्दिक सत्कार व अभिनंदन करण्यात आले. तसेच वकीली व्यवसाय सांभाळीत असतांनाही सुरूवातीपासूनच समर्पित सामाजिक बांधिलकी जोपासल्यास्तव अमेरिकन विद्यापीठातर्फे त्यांना बहुमानाच्या मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आल्याबद्दल तसेच अनेक वकील व न्यायाधीश तथा विविध शैक्षणिक, सांस्कृतिक तथा कला क्षेत्रातील यशवंत विद्यार्थी व नागरिक घडविण्यातही बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार त्यांचा मोलाचा वाटा असल्याचा तसेच साहित्यिक व कला प्रांतातील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाचा उल्लेख करून वकील संघाच्या वतीने, माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजय सदार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर व भव्य प्रतिमा देवून ॲड. कस्तुरे यांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या मुळेच आपण वकीली व्यवसायातील एक यशस्वी वकील होवू शकलो व सामाजिक तथा बहुजन समाजाच्या सेवेसाठी योगदान देवू शकलो अन् एवढेच नाही तर चिखली सारख्या विशाल पंचायत समितीच्या दोनशेहून जास्त गाव-खेड्यांच्या सभापती पदावर अनेक वर्षे कार्य करू शकलो, हे प्रमुख वक्ते या नात्याने, आपल्या भाषणातून व्यक्त करीत अशा व्यक्तिमत्वाची आज समाजाला गरज असल्याचे विषद करताना, सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ ए. टी. उर्फ अशोकराव देशमुख, माजी सभापती, पं. स., चिखली यांनी वरीलप्रमाणे विधान केले.
याप्रसंगी माजी अध्यक्ष अनिल कराडे, माजी अध्यक्ष आर. डब्ल्यू. बडगे, बाळासाहेब वानखेडे, जी. एल्. वानखेडे, सोनोने साहेब, सुनील यंडाईत, सोळंके साहेब, सुनील अवसरमोल, माने साहेब, डी. एस्. वानखेडे, शाकीर साहब, रंजना पठ्ठे मॅडम, संदेश जाधव तथा जाधव मॅडम, राधिका मिनासे मॅडम, स्वाती गवई मॅडम, रेखा हणमंते मॅडम, एस्. पी. चव्हाण, हावरे साहेब, खंडेलवालजी, बाहेकर साहेब, देवा साळवे इ. सर्व मान्यवर वकील मंडळीं तथा न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी वृंद, पक्षकार , नागरिक, वकील कारकून संघटनेचे अयूबखां पठाण, वासूदेव खरात इत्यादींनी हार्दिक शुभेच्छा देवून ॲड. कस्तुरे यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक, सूत्र संचालन तथा आभार प्रदर्शन ॲड. राजरत्न डोंगरदिवे यांनी केले.
________________________
Post a Comment