रामखडक येथे शेतातून एक लाखाची बैलजोडी चोरीला गेले.

 

लोकनेता न्यूज नेटवर्क

उमरी (महेश पडोळे) :- तालुक्यातील रामखडक येथील शेतकरी साहेबराव मोहन शिंदे यांची शेतातील बैलजोडी चोरीला गेली आहे.ही घटना शनिवारी बारा ते एकच्या दरम्यान रात्री घडली.उमरी ते धर्माबाद रोडवर रामखडक फाटा साहेबराव शिंदे यांचे शेत आहे. तिथेच बाजूला जनावराचा गोठा आहे.या गोठ्यात त्यांनी नेहमीप्रमाणे बैलजोडी बांधलेली होती.

    शनिवारी रात्री शेतकरी साहेबराव शिंदे हे शेतात राखणीला नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यानी बैलजोडीची चोरी केल्याची घटना घडली. रविवारी सकाळी शेतकरी शेतात गेले.मात्र, बैलजोडी दिसून न आल्याने त्यांनी बैलजोडीची शोधाशोध केली. शोध लागला नाही.या बैलजोडीची किंमत एक लाख रुपये असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शोध घेण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. बैलजोडी चोरीला गेल्याच्या घटनेने रामखडक परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

________________________

0/Post a Comment/Comments