आपके हर सामाजिक उपक्रममे हम आपके साथ है - ॲडव्होकेट विजयकुमार कोठारी, चिखली

लोकनेता न्युज नेटवर्क

चिखली :- दि. ०८ मातृतीर्थ सिंदखेडराजा, जि. बुलढाणा या मा जिजाऊंच्या माहेरनगरीमधे नुकत्याच दि. ३१-०३-२०२५ रोजी, तेथील लोकप्रिय व दातृत्वशील सामाजिक कार्यकर्ते तथा फुले -शाहू-आंबेडकर पुरस्कार - २०२५ चे सन्माननीय मानकरी आयुष्मान शिवप्रसाद ठाकरे यांनी, बहुजन साहित्य संघ, चिखली च्या, बहुजन साहित्य संमेलन - २०२५ च्या सोहळ्यासाठी, मुक्त हस्ते खुले करून दिलेल्या स्थानिक, मातोश्री मंगल कार्यालयात सर्वार्थ संपन्न झालेल्या या बहुश्रुत साहित्य संमेलनासाठी ज्यांनी मोलाचे सहकार्य व योगदान दिले असे चिखली, जि. बुलढाणा येथील माजी नगरसेवक तसेच लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते तथा अंबिका अर्बन बँक, चिखली चे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कोठारी, यांचा, त्यांच्या बॅंक कार्यालयात त्यांची भेट घेऊन, ब. सा. संघ, चिखलीचे सचिव डॉ. डी. व्ही. खरात तथा अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांनी, त्यांना बहुमानाचा फेटा चढवून तसेच सहभाग सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छासह प्रदान करून त्यांना सन्मानित केले. त्यावेळी त्यांनी उपरोक्त उदगार काढले व या लोक-प्रबोधन-चळवळीत सदैव सोबत असण्यावर जणू शिक्कामोर्तब केले.
      यावेळी अंबिका अर्बन चे व्यवस्थापक मा. गजानन राऊत, तथा इतर अधिकारी व पदाधिकारी मा. जितेंद्र कलंत्री, मा. राजेंद्र हरपाळे, मा. रामदास शिंदे, मा. राहूल चव्हाण यांच्या सह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
________________________

0/Post a Comment/Comments