देऊळगाव राजा :- भूमि अभिलेख विभाग हा मुख्यतः जमिनीची मोजणी करणारा विभाग म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत भूमि अभिलेख विभागाने आपल्या सर्व सेवा या नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकाभिमुख, सहज व जलद गतीने सर्व नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याअंतर्गत राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्त उपअधीक्षक भूमि अभिलेख, देऊळगांवराजा यांचेतर्फे दिनांक 9 एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. मान्यवरांचे उपस्थितीत नागरिकांकरिता भूमि अभिलेख विभागकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजना जसे ई- फेरफार, ई- मोजणी व्हर्जन २, नकाशांचे डिनीटायझेशन, ई- चावडी, रोव्हर तंत्रज्ञानाद्वारे मोजणी इ. बाबत सविस्तर मार्गदर्शन करणेत येणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी या मार्गदर्शन शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय देऊळगाव राजा यांचेकडून करणेत आले आहे.
________________________
Post a Comment