मातृतीर्थ सिंदखेड राजा :- दि. ३१ मार्च रोजी नुकत्याच यशस्वीपणे पार पडलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखली च्या सहाव्या बहुजन साहित्य संमेलन २०२५ च्या सोहळ्या मधील सामाजिक तथा साहित्यिक व विविध क्षेत्रातील मानवीय समर्पित वैशिष्ठ्यपूर्ण कार्याची नागरी सन्मानाची पावती या नात्याने यावर्षी सन्मानित करण्यात आलेल्या तीस फुले -शाहू-आंबेडकर पुरस्कारार्थी़ंच्या यादीतील प्रथम क्रमांकावर असलेल्या सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील माजी प्राचार्य एन्. बी. चापे सर यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात येत असताना, बहुजन साहित्य संघाचे ज्येष्ठ सल्लागार व साहित्यिक तथा ग्रामीण साहित्य चळवळ या सुप्रसिद्ध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. कडूबा बनसोड यांनी उपरोक्त शब्दांमधून मा. चापे सरांच्या सन्मानार्थ आपल्या आंतरिक भावना व्यक्त केल्या. तसेच विशेष म्हणजे संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक माननीय डॉ. गणेश गायकवाड, बुलढाणा यांना त्यांच्या रूग्ण सेवेच्या कार्यबाहुल्यामुळे संमेलनात उपस्थित राहणे शक्य न झाल्यामुळे तोलामोलाचे साहित्यिक व समाजसेवक माननीय चापे सरांना सदर सोहळ्याचे प्रासंगिक अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात येवून, संमेलनाध्यक्षपदी विराजमान करण्यात आले व त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण सोहळा पार पाडण्यात आला. हा पुरस्कार मा. चापे सरांना बहुजन साहित्य संघ, चिखली चे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी व हरहुन्नरी कलावंत डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, सचिव डॉ. डी. व्ही. खरात, चिखली, उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने, छत्रपती संभाजीनगर, सल्लागार मा. कडूबा बनसोड, यांच्या शुभ हस्ते तर प्रा. भास्करराव इंगळे, बुलढाणा, ॲडव्होकेट रेखाताई हणमंते, चिखली, ज्येष्ठ कवी तथा पुरस्कार मानकरी मा. संजय सोनुने, फर्दापूर, ज्येष्ठ साहित्यिक व कवी मा. सुधीर शेरे सर, डोंबीवली, मुंबई, पुरस्कारार्थी तथा सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणारे स्मशान जोगी मा. गणेश शेनुरे, चिखली आणि ज्येष्ठ साहित्यिक कवी मा. दाभाडे साहेब इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री साहित्यिक मा. आशाताई डांगे, छत्रपती संभाजीनगर, ज्येष्ठ साहित्यिक ॲड. शंकर कदम, परभणी, ख्यातनाम साहित्यिक कवी डॉ. सुनील पवार, तथा ब. सा. संमेलनाचे मावळते अध्यक्ष तथा विचक्षक समिक्षक मा. किरण डोंगरदिवे सर, ज्येष्ठ साहित्यिक कवी मा. रमेश पोतदार, चाळीसगाव, चपखल सूत्र संचालक कवयित्री व पुरस्कार मानकरी मा. यशोदा पांढरे, जळगाव, ज्येष्ठ कवी मा. नागोराव सोनकुसरे, नागपूर, खान्देशी अवधूत प्रकाशन संस्था, धुळे च्या संस्थापक अध्यक्षा तथा पुरस्कारार्थी कवयित्री मा. रविना पवार पाटील, दुसाने, १४ यशस्वी झेप साहित्य संमेलनाचे शिल्पकार तथा प्रख्यात झेप साहित्य चळवळीचे प्रणेते मा. डी. एन्. जाधव, तसेच स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲम्बेसेडर डॉ. संघर्ष सावळे, तथा पिंपल्स एज्युकेशन सोसायटी चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला महाविद्यालय, औरंगाबाद-छत्रपती संभाजीनगरचे माजी प्राचार्य डॉ. हिंमतराव जाधव, तथा भावकवी अंकुश पडघान, बोरगाव काकडे, चिखली आणि केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे विशेष उपाध्यक्ष मा. रविंद्र सोनार, गोळेगाव, बोदवड, ज्येष्ठ कवयित्री तथा पुरस्कार मानकरी मा. शीला शिवरकर, कारंजा लाड, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे संविधान गौरव पुरस्कार प्राप्त तथा फुले -आंबेडकरी वैचारिक प्रबोधनपर हजारो सोहळ्यांचे लाखो छायाचित्रांचे शिल्पकार मा. विठ्ठल सपकाळ, छत्रपती संभाजीनगर इ. सह महाराष्ट्र तथा गुजरात, गोवा इत्यादी प्रांतातील शेकडो साहित्यिक, कवी रसिकांची यात्रा सदृश उपस्थिती होती.
________________________
Post a Comment