सिंदखेड राजा :- दि. 15 रोजीशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री. रामकृष्णदादा शेटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आदरणिय सचिव श्री.प्रेमराजजी भाला यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर सिंदखेडराजा येथील वार्षिक आढावा बैठक अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली.
यावेळी आढावा बैठकीला शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय संचालक श्री.सहदेवरावजी सुरडकर, श्री . अरविंदजी शिंगणे,श्री.अशोकभाऊ कोटेचा, श्री.बाबासाहेब मिनासे,श्री.सुनीलजी लाहोटी, डॉ.भूषणजी डागा, श्री.सुहासजी जामदार, निरीक्षक समितीचे सेवानिवृत्त प्राचार्य सुभाषजी फटिंग , श्री.शंकरराव भालेराव यांच्यासह मा.स्थानिक सल्लागार श्री. प्रकाशरावजी वायकोस , श्री.अनंतरावजी खेकाळे, श्री.रामभाऊ आढाव,श्री.
दिलीपभाऊ काळे , श्री.काशिनाथराव भालेराव यांची उपस्थिती लाभली. तसेच मुख्याध्यापक श्री.सुभाषजी मोरे, प्रभारी प्राचार्य श्री.संदीप चौधरी, कॉन्व्हेन्टच्या मुख्याध्यापिका कु.केदार यांची उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्याहस्ते माता सरस्वतीचे पूजन करून तसेच सरस्वती वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविकातून आदरणिय एस. टी. मोरे यांनी आढावा बैठकीचे आयोजन आणि हेतू स्पष्ट केला.
सदर बैठकीत शिक्षक, शिक्षिका यांच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर संस्थेचे सचिव आदरणिय श्री.प्रेमराजजी भाला यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून उपस्थित शिक्षक बंधू भगिनींच्या वर्षभरातील कामाचे कौतुक करून विद्यार्थी व शाळा यांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.रामकृष्णदादा शेटे यांच्या वतीने श्री.सुहासजी जामदार यांनी आपल्या समारोपीय भाषणात शिक्षकांनी विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन ज्ञानदानाचे पवित्र व्रत जोपासत राहावे आणि सुशिक्षित, सुजान पिढी तयार करावी असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.के.एस.गोरे यांनी केले व आभार जे.बी माने यांनी मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.बैठकीची सांगता शांती मंत्राने करण्यात आली.
________________________
Post a Comment