बहुजन साहित्य संमेलनासारख्या प्रबोधनपर सोहळ्याची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे ! - दिपक सपाटे

लोकनेता न्युज नेटवर्क

देऊळगाव राजा :- दि. ११-०४-२०२५- रोजी बहुश्रुत बहुजन साहित्य संघ, चिखली चे अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली तथा सह संघटक भावकवी अंकुश पडघान, बोरगाव काकडे, चिखली यांनी देऊळगाव राजा येथील वैद्यकीय औषध व्यवसायी किंतु पुरोगामी तथा सकारात्मक विचारांचे दातृत्वशील व्यक्तित्वाचे धनी मा. दिपक सपाटे यांची आज रोजी आवर्जून भेट घेऊन, दि. ३१-०३-२०२५ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे, बहुजन साहित्य संघ, चिखली च्या वतीने पहिल्यांदाच संपन्न झालेल्या सहाव्या बहुजन साहित्य संमेलन सोहळ्यासाठी दिलेल्या सहकार्य व योगदानासाठी, मा. दिपक सपाटे यांना संमेलनाचा बहुमानाचा फेटा चढवून स्मृतिचिन्ह व सहभाग सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा सपत्नीक सत्कार केला त्यावेळी मा. सपाटे यांनी वरील विधानाने आपली सामाजिक व सूज्ञ कृतज्ञता व्यक्त केली व अशा कार्यक्रमांना कायम सहकार्याचे आश्वासन दिले.
________________________

0/Post a Comment/Comments