कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा योद्धा कृष्णा भोयर


लोकनेता न्यूज नेटवर्क

नांदेड (बाजीराव गायकवाड) :- महाराष्ट्रातील कामगारांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी कणखरपणे लढणारे कामगार नेतृत्व म्हणलं की कॉम्रेड कृष्णा भोयर सर यांच्याकडे पाहिल्या जाते. सदैव कामगारांच्या व सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी लढणारे कामगार नेते कॉम्रेड कृष्णा भोयर सर ३४ वर्ष सेवा करून आज रोजी सेवानिवृत्त होत असताना त्यांचे बद्दलचा हा लेख आहे.
कामगार नेते कॉम्रेड कृष्णा भोयर सरांचा आणि माझा तसा संबंध 1995 मध्ये अप्रेंटीशीप करताना आला .नुकताच मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये अप्रेंटशिप करीत होतो आणि त्यावेळी कॉम्रेड कृष्णा भोयर सरांनी अप्रेंटीशीप कृती समितीची स्थापना केलेली होती. मी त्या संघटनेत सामील झालो आणि भोयर सरांच्या संपर्कात आलो तेव्हापासून जेव्हा जेव्हा भोयर सरांनी आवाज दिला त्या त्या वेळी आम्ही सर्व बेरोजगारांनी भोयर सरांसोबत मुंबई विधान भवनावर, नागपूर अधिवेशनावर आपल्या न्याय, हक्कासाठी मोर्चे आंदोलन धरणे दिले आम्ही सर्व बेरोजगार होतो तेव्हा सरांनी बेरोजगारासाठी विविध आंदोलने केलीत.हजारो बेरोजगारांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी भोयर सर नेहमी लढलेत आणि आताही लढत आहेत. कधीही कोणत्याही लढ्यात ते थांबले नाहीत मी या घटनेचा साक्षीदार आहे .हजारो कामगारांचे प्रश्न त्यांनी आजपर्यंत सोडविले. हजारो लोकांना त्यांनी घडविले आहे. आज रोजी कामगारांचे प्रश्न घेऊन ते लढत आहेत. कामगारावर प्रशासनाचा होणारा अन्याय यासाठी ते नेहमी आवाज उठवतात. वेगवेगळे आंदोलने करून शासनाला लक्षात आणून देतात एवढेच नाही तर ज्या ज्या वेळी विविध प्रश्न किंवा आंदोलन उभारण्यात आली त्यावेळी भोयर सर हे सर्व संघटनेला सोबत घेऊन त्यांची एक वज्रमूठ बांधून सर्वांची कृती समिती निर्माण करून कामगारांच्या हितासाठी एक संघपणे लढण्याची बळ आणि कौशल्य भोयर सरांमधे आहे. आजमीतिला त्यांनी हजारो कामगारांचे हजारो प्रश्न सोडविले आहेत. आणि रोज एक नवीन नवीन प्रश्न ते कामगारांचे सोडवत असतात. संकटकाळी कधीही दुसऱ्याच्या मुसिबत्त मध्ये मदत करणारा कामगारांचा एक बुलंद आवाज, एक खरा हिरा म्हणून कामगार चळवळीत त्यांनी त्यांचे कार्य अधोरेखित केलेले आहे. त्यांच्यासाठी ह्या दोन ओळी आहेत आणि त्यांना त्या लागू होतात. 

आदमी ना कद से बडा होता है, ना पद से बडा होता है .
जो आदमी दुसरो के मुसिबत मे खडा होता, है वही सबसे बडा होता है.
 वही सबसे बडा होता है .

या ओळीप्रमाणे काॅ. कृष्णा भोयर सरांचं कार्य आणि कर्तुत्व आहे. प्रत्येकांच्या सुखदुःखात संकटात ,अडचणीत धावून येतात म्हणूनच भोयर सर हे सबसे बडे बडे आहेत. अत्यंत हुशार, बुद्धिजीवी, अभ्यासू नेतृत्व असं व्यक्तिमत्व असलेले भोयर साहेब कामगारांची जाणीव ठेवून कामगारांच्या प्रति सामाजिक न्यायाच्या भावना मनात ठेवून ते सर्व कामगारांचे प्रश्न राज्यभर सोडविण्याचे काम करीत असतात. त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ.भारतीताई भोयर या सुद्धा नुकत्याच सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा मुलगा शिवम इंजिनियर झालेला आहे. मुलगी दिव्यादिदि डॉक्टर आहे .असा त्यांचा परिवार आहे .आणि ताईंचा सुद्धा भोयर सरांसोबत प्रत्येक वेळी विविध आंदोलनामध्ये सहभाग असतो. त्या सुद्धा समाजासाठी आणि आपल्या कामगारासाठी प्रत्येक आंदोलनात लढत असतात.
संपूर्ण राज्यामध्ये कामगारांसाठी संघर्ष करणारा लढाऊ योध्दा, नेता म्हणून भोयर सरांची ओळख झालेली आहे. ते कधीही थांबत नाहीत, कधी ते खचून जात नाही .त्यांची लढाई म्हणजे सर्वसामान्य कामगारांना प्रेरणा आणि ऊर्जा असते आणि ऊर्जा देणारे कॉम्रेड कृष्णाजी भोयर सर आमच्यातून आज रोजी सेवानिवृत्त होत आहे त्याबद्दल आम्हाला थोडं दुख आहे. परंतु

"सेवानिवृत्ती ही कोणत्याही रस्त्याचा अंत नसून एका नवीन हायवेची सुरुवात आहे. "

म्हणून सर आपण जरी सेवानिवृत्त होत असला तरी आपणास आता खुले आम लढणे सोपे जाणार आहे. कर्मचारी म्हणून काही आपल्याला बंधने आली असतील परंतु आता आपल्याला खुले आम लढायला संपूर्ण रान मोकळे राहणार आहे .आपण आपला लढा अधिक तीव्र करुण सर्व कामगारांना आपण सदैव न्याय मिळवुन देणार आहात. कामगारासाठी लढणारा एक बुलंद आवाज, कामगारांची तोफ सेवानिवृत्त होत आहे .त्यांचे सोबत लढणारे सैनिक विजय रणखांब सुरेश गुंडमवार ,बालाजी सकरगे, संजय टाक, भीमराव खानसुळे, मोईन भाई व अन्य कार्यकर्तेनी सेवानिवृत्ती शुभेच्छा दिल्या आहेत.
"सूर्यासारखे तळपुनी जावे 
क्षितिजावरून जाताना
 दगडालाही पाझर यावा 
निरोप शेवटी घेताना"
सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा सरजी.

वृत्त संकलन 
विजय रणखांब 
गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन
एम ए ,एम जे अँड एम एस 
 झोन प्रसिद्धीप्रमुख 
वर्कर्स फेडरेशन परिमंडळ महावितरण नांदेड.
मो.9423429777
-------------------------------------------------- 🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉https://join.lokneta.in/

0/Post a Comment/Comments