लोकनेता न्युज नेटवर्क
स्त्री सक्षम झाल्यास, देश सक्षम होईल - श्री प्रकाश शिणकर
भोकरदन | राम शिंदे:-भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकादेवी फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थी यांना पोस्को, चाइल्ड सायकॉलॉजी, सायबर क्राईम, गुड टच बॅड टच, अंधश्रद्धा निर्मुलन, जादूटोणा प्रतिबंधक कायदा, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा आदींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब जालना व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब जालना यांनी महिला कवच सुरक्षा संबंधाने प्रकाशित केलेले पुस्तक "आधुनिक जगात एक पाऊल पुढे सुरक्षा मंत्र" या प्रकाशित केलेल्यापुस्तकामधील सर्व मुद्देनिहाय बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. नायलॉन मांजाबाबत मार्गदर्शन केले विदयार्थी व पालक यांचेत सुसंवाद असणे, तसेच विशेष शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करावे. आपला कोणीतरी व्यक्ती कशा पद्धतीने फायदा घेतो आणि नंतर आपल्याला त्याचे भयंकर परिणाम स्वतःला भोगावे लागतात. म्हणून आपण सक्षम राहावे, निर्भय राहावे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
रेणुकादेवी फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या या मार्गदर्शन शिबिरामध्ये पारध पोलीस स्टेशनचे श्री प्रकाश शिनकर, ग्रामीण साहित्यिक रामराव रिंढे, रेणुकादेवी फाउंडेशनचे अध्यक्ष रामराजे ढमाले आदिसह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
________________________

Post a Comment