पाणंद रस्ता फक्त कागदावर... काम न करता मस्टर उचलण्याचा प्रकार

 

लोकनेता न्युज नेटवर्क


 अवघडराव सावंगी येथील गैरकारभार

भोकरदन|राम शिंदे :–शेतात ये-जा 
करण्यासाठी शेतकऱ्यांची वाट सुकर व्हावी,यासाठी राज्य शासनाने पाणंद रस्ते योजना आणली.या योजनेअंतर्गत भोकरदन तालुक्यासह जिल्ह्यात रस्त्यांना मंजुरी देण्यात आली.मात्र यातील किती रस्ते हे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले आहेत.कारण उदाहरण द्यायचे झाल्यास भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील रोजगार हमी योजने अंतर्गत टाकळी रस्त्यावरील दिलीपराव राऊत यांच्या घरापासून एक किलोमीटर पर्यंत रस्त्याची मंजुरी होती.परंतु या रस्त्याचे कोणतेही काम न करता मस्टर रोजगार सेवक व इंजिनियर यांनी मस्टर तयार करून दिले व मस्टर उचलत असल्याची तक्रार अवघडराव सावंगी येथील हरिदास दगडूबा फुसे यांनी अर्जाद्वारे लेखी तक्रार भोकरदन येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय भोकरदन,गट विकास अधिकारी कार्यालय पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे दि.२१ जुलै रोजी केली असून शासनाची लाखो रुपयाची फसवणूक करून अपहरण केले असल्याने ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून ग्रामविकास अधिकारी यांना सेवेतून निलंबित करावे व सरपंच याच्यावर गंभीर स्वरुपात गुन्हा दाखल करावा नसता लोकशाही पद्धतीने उपोषण करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी असा सजग इशाराही देण्यात आला आहे.
________________________

0/Post a Comment/Comments