छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची यवत मध्ये विटंबना, यवत गाव बंद,सर्व स्तरातून जाहीर निषेध...

लोकनेता न्युज नेटवर्क 

दौंडlबबनराव धायतोंडे :- दौंड तालुक्यातील यवत स्टेशन येथील नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकाने तोडफोड करून विटंबना केल्याची घटना (दि.२६) रोजी घडली आहे. ही घटना पहाटे साडेचार ते साडेपाचच्या वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.घटनेच्या अनुषंगाने यवत पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 सकल हिंदू समाजाच्या यां घटनेमुळे भावना दुखावल्या गेल्या असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या यां कृत्याच्या विरोधात,हिंदू धर्माच्या भावनांना कुठेतरी ठेचं पोहचविण्याचे काम झाले असल्याने अश्या प्रवृत्ती विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निषेध म्हणून यवत गावातील आणि परिसरातील ग्रामस्थांनी सर्व गाव बंद ठेऊन जाहीर निषेध केला आहे.
यावेळी यवत गावातून मोठ्या संख्येने हिंदू आणि मुस्लिम बांधवानी निषेध मोर्चा काढून यवत पोलिसांना आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी यवत गावातील कालभैरवनाथ मंदिरासमोर निषेध सभेचे आयोजन केले होते.यामध्ये मोठया संख्येने हिंदू आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.गावातील संपूर्ण व्यापारी वर्ग शेतकरी आणि नागरिकांनी आपले व्यवसाय,दुकानें,हॉटेल्स बंद ठेऊन निषेध व्यक्त केला आहे.

   मुस्लिम समाजाच्या वतीने देखील सदर घटनेचा निषेध करण्यात आला असून आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी देखील यवत येथील मुस्लिम समाजाने केली आहे. आरोपींवर कठोरात कठोर करावी करण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.
       यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल,आमची सर्व यंत्रणा आरोपीच्या शोधात पाठवली आहे,आम्ही २४ तासात आरोपीस अटक करू,अश्या मानसिक विकृतीच्या लोकांना कदापी पोलीस यंत्रणा पाठीशी घालणार नाही,सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवा,सर्वांनी सहकार्य करावे, कायदा हातात घेऊ नये असे आवाहन दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस व यवत पोलिसाकडून करण्यात आले आहे.
       जोपर्यंत आरोपीस अटक करण्यात येत नाही,तोपर्यंत गाव बंद राहील,आणि तोपर्यंत महाराजांच्या प्रतिमेची स्थापना होणार नसल्याचे मत मोठ्या संख्येने जमलेल्या उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.
________________________

0/Post a Comment/Comments