देगलूर|लक्ष्मी मनधरणे :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग संचालकपदी मा. कुलगुरूंनी निवड केली आहे.
यापूर्वी त्यांनी २०१५ ते २०१९ दरम्यान विद्यार्थी विकास विभागाचे संचालक म्हणून उत्तमपणे जबाबदारी सांभाळली होती. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अनेक नवे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले होते. विशेषतः आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात लॉट्स पद्धतीचा अवलंब करून युवक महोत्सवास शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यास प्रथमच आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात सहभागी होण्याची संधी याच काळात मिळाली. या त्यांच्या अनुभवाचा उपयोग विद्यार्थी विकास विभागास नक्कीच होईल.
त्यांच्या या निवडीबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य डॉ एम एम चमकुडे उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे
_______________________

Post a Comment