देगलूरात एमआरपीपेक्षा जास्त दराने दारू विक्री

मद्यप्रेमी मध्ये प्रशासनाविरुद्ध नाराजी
लोकनेता न्युज नेटवर्क

देगलूर | लक्ष्मी मनधरणे :-देगलूर शेरासह तालुक्यातील बिअर बार चालकांनी मनमानी करून नियमांचे उल्लंघन‌ करत विदेशी दारू एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री करत आहे. बार मालक नियमांचे पालन न करता जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असल्याने मद्य सेवन करणाऱ्यांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.स्थानिक प्रशासन योग्यरित्या काम करत नसल्यामुळे बार मालकांना मनमानी करण्याची संधी मिळत आहे. शासनाने देशी-विदेशी दारू च्या किंमतीत काही दिवसापूर्वी वाढ केलेली आत्ता मात्र देगलूर येथील काही बिअर बार मालकानी चक्क पूर्वीच्या एमआरपी किमतीची दारू नवीन किमतीच्या भावात दारू विकत आहे कोणत्या बियर बार दुकानात भाव फलक न लावता दारू विकली जात असून मनमानी कारभार केला जात आहे.
       शासनाने ठरवून दिलेल्या एमआरपी नुसार थोड्या प्रमाणात शिल्लक पैसे घेण्यासाठी ग्रहाकांची हरकत नव्हती. परंतु बाटली पॅकींगी करताना एमआरपी १८० असताना ती बॉटल २८० रुपये भाव वाढ करून मद्यप्रेमीची लुट केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे उत्पादक शुल्क अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत का? असा प्रश्न शहरातील मद्यप्रेमीना पडला आहे .

सर्व्हिस चार्जच्या नावाखाली लूट
       शासनाने ठरवून दिलेल्या नियमापणे मद्यपान करणार्यांना सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. दारू पिण्यासाठी लागणारा परवाना नसतो. बोगसगिरी करून मॅस्टर भरल्या जाते. शासकीय भावफलक नुसार विक्री केली जात नाही.सव्हिस चार्ज म्हणून लुट लावली आहे. याकडे तात्काळ संबधित अधिकारी यांनी लक्ष वेधून मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.
________________________

0/Post a Comment/Comments