गोंडपिपरी सह ग्रामीण भागात सुगंधित तंबाखूची अवैध विक्री

 

लोकनेता न्युज नेटवर्क


 अन्न औषधी व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.

 
गोंडपिपरी|आशिषआ.निमगडे:–राज्यात सुगंधित तंबाखू व गुटखा बंदी असूनही शहरात व खेड्या भागात काही किराणा दुकानातून अवैध सुगंधी तंबाखू व गुटखा जोरात सुरू आहे. संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून यावर आळा घालावा अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे. तेलंगणा,मध्यप्रदेश येथून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची आवक होत असून यात लाखोंची उलाढाल होत आहे. राज्यात सुगंधित तंबाखू,गुटखा यावर बंदी घातल्यानंतरही ते मोठ्या प्रमाणात मिळत आहे. पानठेले किराणा दुकान, ढाबा व इतर ठिकाणी छुप्या मार्गाने त्याची विक्री होत आहे. नागरिक कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडू नयेत म्हणून गुटखा, सुगंधित तंबाखू, खर्रा आदी वस्तू व कायद्याने बंदी घातली आहे. परंतु त्यानंतरही गोंडपिपरी येथील काही ठोक व चिल्लर किराणा दुकानातून त्याची विक्री करीत आहे.काही दुचाकी व चार चाकी वाहनातून सुगंधित तंबाखू व गुटखा  ग्रामीण भागात खुल्या विक्री करताना दिसून येत आहे. तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यात हानीकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात. या पदार्थाचे सेवन  करणारे सावधानीचा इशारा म्हणून गुटखा,तंबाखूच्या पुळ्यावर नमूद केला जातो. तरीपण तरुण पिढी जीवघेण्या आजारापासून वाचावा यासाठी शासनाने यावर बंदी घातली आहे. परंतु गोडपिंपरी,भंगाराम तळोधी, करंजी,विठ्ठलवाडा, वडोली, धाबा, तोहोगाव, परिसरात तेथील काही ठोक व चिल्लर किराणा दुकानातून सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे. शाळा तसेच महाविद्यालय परिसराच्या शंभर मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास तसेच सेवन करण्यास बंदी असतानाही शाळा व विद्यालय जवळच्या अनेक दुकानातून तसेच टपरीवरून सुगंधीत तंबाखूची विक्री सुरू आहे. सुगंधीत तंबाखू तसेच गुटक्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेले तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून युवा पिढी गारद होत आहे. ही मोठी सामाजिक हानी असून शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन सुगधित तंबाखू व गुटखा विक्रीवर त्वरित अंकुश लावण्यात यावा. अशी मागणी तालुका परिसरातील नागरिकाकडून होत आहे.
 ________________________

0/Post a Comment/Comments