हदगांव । चंद्रकांत भोरे:- गुरू पोर्णिमेनिमित्त थोरला मठ वसमत येथे शिवाचार्य डिगांबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यानिमित्त शिवाचार्य डिगांबर महाराज यांच्या दर्शनासाठी हदगाव तालुक्यातील शिष्यमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या शिष्य मंडळींच्या उपस्थिती पाहुन गुरू काही क्षण भावुक झाल्याचे दिसून आले. शिष्य मंडळींच्या गर्दीने थोरला मठ परीसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाला हदगाव तालुक्यातील अनेक शिष्य मंडीळ उपस्थिती होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बबनराव माळोदे,विलासराव महाजन, सुभाषराव चिंचबणकर सचिन हानवते मल्लिकार्जुन मुखेडी अदी उपस्थित होते.
________________________

Post a Comment