लोकनेता न्युज नेटवर्क
विष्णू मोहन पोले:– महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त हडपसर येथील गतिमंद मुला-मुलींच्या शाळेत खाऊ वाटप करत आनंदाने वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस सौ. स्मिता तुषार गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमात स्पंदन ऑटीझम सेंटरच्या फाउंडर सौ. माधुरी गाडेकर व प्रकाश ज्योत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. यशोदा भांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध खाद्यपदार्थ वाटण्यात आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहराचे चिटणीस श्री. गोविंद कांगणे, सौ. अंजली शहा, सौ. विमल वागलगावे, सौ. त्रिशाला वर्मा यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्मितसेवा फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस समाजहिताच्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. उपस्थित सर्वांनी हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त केली.
_______________________

Post a Comment