जळगाव पू.खा. :- खान्देशचे ज्येष्ठ कवी तथा सामाजिक चळवळीतील खंदे कार्यकर्ते आयुष्मान भीमराव सोनवणे, एरंडोल यांना बहुजन साहित्य संघ, चिखली च्या वतीने जाहीर झालेला ' फुले-शाहू-आंबेडकर ' बहुमानाचा पुरस्कार २०२५ , ते बहुजन साहित्य संमेलन, मा जिजाऊंच्या माहेरनगरी सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे संपन्न झाले त्यावेळी नोकरीच्या कारणास्तव पोहचू न शकल्यामुळे, आज दि. १३-०७-२०२५ रोजी ब. सा. सं. चे अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, सचिव डॉ. डी. व्ही. खरात, उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने व प्रसिद्धी प्रमुख अंकुश पडघान यांनी त्यांना सदर पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल हॉल, लेवाभवन, जळगाव पू. खा. येथे १८ व्या बहिणाबाई-सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य आणि कवी संमेलन निमित्ताने आलेले असतानासन्मानाने प्रदान करण्यात आला. या निमित्ताने कवी भीमराव सोनवणे यांचे सर्व साहित्य तथा सामाजिक क्षेत्रातील मित्र मंडळींतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
________________________

Post a Comment