लोकनेता न्युज नेटवर्क
प्रदेश सचिव देविदास राठोड यांचे प्रतिपादन.
कंधार । धोंडीबा मुंडे:–महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता सामाजिक उपक्रम राबवत भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीने रक्तदान करून सामाजिकतेची जाण ठेवत रक्तदानाने अनोख्या शुभेच्छा दिल्या असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव देविदास राठोड यांनी रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले मुख्यमंत्र्याचा वाढदिवस हा बॅनर बाजी न करता सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान करून करावा असे सांगितले त्या निमीत्त संबंध महाराष्ट्रभर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे,त्याच निमित्त भारतीय जनता पार्टी कंधार उत्तर मंडळ, कंधार दक्षिण मंडळ व कंधार शहर मंडळ यांच्या वतीने दि.२१ जुलै रोजी महाराणा प्रताप चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी ११२ रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक देविदासभाऊ राठोड यांनी उपस्थित त्यांना रक्तदान केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व या अनोख्या उपक्रमाची प्रशंशा केली.
या रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी कंधार शहर मंडळ, कंधार दक्षिण व कंधार उत्तर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेशाच्या चिटणीस देवीदास भाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ११२ रक्तदात्यांनी रक्तदान केले,या वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस चित्रलेखाताई गोरे, राष्ट्रीय परिषद सदस्य धोंडीबा भायेगावे,दक्षिण मंडळ अध्यक्ष अड विजय धोंडगे,कंधार उत्तर मंडळाध्यक्ष बालाजीराव पांडागळे,कंधार शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार,लोहा उत्तर मंडळ अध्यक्ष शरद पवार, माझी पंचायत समिती सदस्य डॉ.सुनील धोंडगे,
माझी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण,पंचायत समितीचे सदस्य सत्यनारायण मानसपूरे, दत्ता करामुंगे,आनंदराव किडे, दत्तात्रय पेठकर, व्यंकट गव्हाणे नागोराव पाटील मोरे एजाज पटेल गोविंदराव कपाळे शोकराव गोरे,सागर डोंगरजकर, प्रवीण बनसोडे,अरविंद वसमतकर,भारत पाटील कदम, अनिल मोरे,शरद भागानगरे,जयराम कांबळे, सरपंच गणपत गायकवाड,अनिल फरकंडे, सुहास दिग्रसकर,संतोष कराळे यांच्या सह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती. रक्त संकलन नंदिग्राम ब्लड सेंटर नांदेड यांनी केले यावेळी ब्लड सेंटरचे संपर्क अधिकारी आनंद लोणे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
________________________

Post a Comment