सर्वत्र गॅस सिलिंडर तुटवडा काळा बाजार, घरगुती गॅस व्यवसायीना सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी दौंड पुरवठा अधिकारी मुकेशवार निमजे यांना निवेदन देऊन पँथर जयदीप बगाडे यांनी केली मागणी


लोकनेता न्युज नेटवर्क

दौंड (प्रतिनिधी) :- न्यू महाराष्ट्र पँथर सेनेचे अध्यक्ष पँथर जयदीप माणिक बगाडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनसह तालुका पुरवठा अधिकारी मुकेशवार निमजे, दौंड तहसील कार्यालय दौंड यांना भेटून निवेदन दिले. अनेक ग्राहकांना गॅस एजन्सी कडून "गॅस सिलिंडर उपलब्ध नाही" किंवा "पुरवठा कमी आहे" आसे सांगून सिलिंडर देण्यात विलंब केला जात आहे.परंतु काही ग्राहकांनी प्रत्यक्ष एजन्सीवर जाऊन अतिरिक्त पैसे दिल्यास किंवा ओळखीच्या माध्यमांतून सिलिंडर लगेच उपलब्ध करून दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. यावरुन संबंधित गॅस एजन्सी कडून काळाबाजार होण्याची दाट शक्यता असल्याचे पँथर जयदीप बगाडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.ऑनलाईन बुकिंग ठप्प झाली असून एजन्सीवर ग्राहकांनाच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेक कायद्याचा अहवाला निवेदनात पँथर जयदीप बगाडे यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीची सखोल चौकशी ची मागणी करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे का याची चौकशी करून कारवाई ची मागणी केली आहे.ऑनलाईन बुकिंग प्रणाली तत्काळ सुरू करुन त्यालाच प्राधान्य देण्याची मागणी केली. काळा बाजार, साठे बाजी किंवा नियमभंग आढळल्यास संबंधित एजन्सीवर आवश्यक वस्तू अधिनियम व इतर लागू कायदया नुसार कठोर कारवाई ची मागणी पँथर जयदीप बगाडे यांनी केली तसेच हि मागणी करताना दौंड शहरात व तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर हा हाॅटेल व्यवसायीक मोठ्या प्रमाणात करत असून अश्या प्रकारा मुळे काही महिन्यांपूर्वी दौंड शहराजवळ जगदंबा हाॅटेल मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून त्यांच्या गंभीर स्फोट होऊन पाच ते सहा जन दगावले आहे. तरी दोषी गॅस एजन्सी वर कठोर कारवाई झाली नाही. व हाॅटेल मालकावर देखील कारवाई झाली नाही. हया सर्व प्रकारची दखल घेऊन हाॅटेल व गॅस एजन्सी अचानक धाड टाकणारे भरारी पथक नेमण्यात यावे व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी न्यू महाराष्ट्र पँथर सेनेचे अध्यक्ष पँथर जयदीप बगाडे यांनी केली. दौंड पुरवठा अधिकारी मुकेशवार निमजे यांनी दोषींवर कारवाई केली जाईल.हाॅटेल मालक व गॅस एजन्सी मालक यांना पत्र काढून समज दिली आहे. ग्राहकांनी सुद्धा विनाकारण गॅस एजन्सी समोर गर्दी करू नये. बुकिंग ऑनलाईन करून नंतरच गॅस घेण्यासाठी जावे दोषी कोणीही आढळल्यास गय केली जाणार नाही. त्यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.ग्राहकांना काही तक्रार असल्यास दौंड तहसील कार्यालय पुरवठा विभागात तक्रार दाखल करावी त्याची शहानिशा करून लगेच कारवाई करण्यात येईल असे पुरवठा अधिकारी मुकेशवार निमजे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. हया वेळी निवेदन देताना न्यू महाराष्ट्र पँथर सेनेचे अध्यक्ष पँथर जयदीप माणिक बगाडे, दौंड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष पांडूरंग गायकवाड, पत्रकार अतिष जगताप, विजय बगाडे, विनोद भालसेन तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments