लोकनेता न्युज नेटवर्क
ए मेरे वतन के लोगो जरा जरा अखोमे भरलो पाणी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी
कुंडलवाडी | गंगाधर दुसलवाड:- कारगिल विजयी दिनानिमित्त बिलोली येथील आंतरभारती शिक्षण संस्थेच्या पूज्य साने गुरुजी प्राथमिक व आंतरभारती माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयमाला पटने या होत्या. या सन्मान सोहळ्यात शंकरराव तुळसाबाई रामराव बोंगाळे, सुरेश राहूबाई नागोराव जाधव, शंकरराव भागीरथबाई बसवंतराव मुंडकर, गंगाधर गंगुबाई नागोराव गायकवाड, संतोष अहिल्याबाई शंकरराव उत्तरवाड, पुंडलिक काशाबाई सखाराम क्षीरसागर, रामेश्वर इंदुताई वसंतराव सूर्यवंशी, चंदर गंगाबाई बसवंतराव अनंतवार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित सैनिकांनी आपल्या सेवा काळातील आठवणी विद्यार्थ्यांपुढे प्रकट करत सैनिकांचे योगदान विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. उपस्थित सैनिकांपैकी सर्वांनीच जम्मू कश्मीर, राजस्थान, पंजाब, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, ओरिसा, तामिळनाडू, नागालँड , मणिपूर आदी राज्यात सेवा बजावली. यापैकी पुंडलिक क्षीरसागर हे कारगिल युद्धात स्वतः सहभागी असल्याने त्या युद्धाच्या आठवणी विद्यार्थ्यांपुढे सांगितल्या.
सहशिक्षक दत्तात्रय साखरे यांनी प्रास्ताविक विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश सोनकांबळे यांनी केले
*वैरी देश पायमल्ली पण माणुसकीच्या तत्वाची आयुष्यांहून सैनिकांच्या देशसेवा हीच महत्वाची*
उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक व्ही जी चंदनकर यांनी मानले.
______________________

Post a Comment