पंतप्रधान आवास योजनेच्या लाभधारकांची उमरीत अडवणूक मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली

 लोकनेता न्युज नेटवर्क

उमरी (किसन गायकवाड) :- पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभधारकांची वेळेवर कामे होत नाहीत. त्यांची डेटा एन्ट्री अँपरेक्टर बालाजी केरबा कदम यांच्या कडून आर्थिक अडवणूक होत आहे. याबाबत त्यांच्या विरोधात अनेक वर्षांपासून तक्रारी येत आहेत. संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या कडे गांभीर्याने लक्ष देत नाही. ही गंभीर बाब असून पुढील काळात अशी चुक खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दि ९ जुलै २५ रोजी उमरी पंचायत समिती कार्यालयात झालेल्या आढवा बैठकीत डेटा एन्ट्री अँपरेक्टर बालाजी कदम व गटविकास अधिकारी व उपस्थित कर्मचाऱ्यांची कान उघाडणी केली आहे.
        प्रधानमंत्री घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता स्थानिक पातळीवरील प्रशासन अधिक गतीने काम करीत नाही. नमुना नंबर ८ न घेता कशी कामे केली जातात. असे म्हणत सभागृहात उपस्थित असलेल्या डेटा एन्ट्री अँपरेक्टर बालाजी कदम व अधिकारी यांची जिल्हा परिषद नांदेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी कान उघाडणी केली आहे. तसेच प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या कामाची गती वाढविण्यासाठी सुचना दिल्या आहेत.

          भारत देशातील नागरिकांचे घरकुलांचे सपन्न पुर्ण व्होण्याकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांसाठी भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु स्थानिक पातळीवर घरकुल व विविध विकास कामाला गती मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी पंचायत समिती उमरी कार्यालयाला दि ९ जुलै २५ रोजी भेट देऊन नागरीकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत. अधिका-यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उमरी तालुक्यातील घरकुल लाभधारकांचे कामे वेळेवर का होत नाहीत. घरकुल लाभार्थींची अडवणूक का केली जाते या व इतर समस्या बाबत अधिकारी आणि डेटा एन्ट्री अँपरेक्टर बालाजी कदम यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. कामे करीत असताना चांगले व प्रभावीपणे कामे केली पाहिजे. घरकुलासाठी जी नियमावली आहे. त्या नियमावलीचे तंतोतंत पालन केले पाहिजे. तसेच नमुना नंबर ८ न घेता घरकुलांला परवानगी कशी काय दिली जाते. या संदर्भातही पश्न उपस्थित करीत कावली यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम ठरवुन दिलेल्या वेळेत पूर्ण झाले पाहिजे. अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

          या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद नांदेड, राजकुमार मुकावार, गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरी, सुधिश माजंरमकर, कनिष्ठ अभियंता अतुल कांबळे, तुळशीराम होनमाने, गुट्टे , राजेश्वर भुरे, मोटरवार विस्तार अधिकारी, जाधव मँडम आणि तालुक्यातील इत्यादी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते        ______________________

0/Post a Comment/Comments