लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड|यज्ञकांत कोल्हे:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वास्तवदर्शी साहित्यातून माणूस व मानविवृत्तीचे दर्शन घडवले आहे. त्यांनी समता व बंधुत्वाचे विचार समाजात रुजवले आहेत.मराठी साहित्यात वास्तवदर्शी लेखनाची अमीट छाप उमटवणारे डॉ.अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, तर लोककलेचे प्रभावी माध्यम बनून त्यांनी समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. लोककथा, पोवाडे, वगनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून त्यांनी वंचित, शोषित घटकांचा आवाज बुलंद केला आणि त्यांच्या वेदनांना शब्दरूप दिले आहे.समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवणाऱ्या आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबूत करणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी राज्यसभेत केली. अण्णाभाऊ साठे यांचे केवळ साहित्यिक योगदान नसुन, सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. आण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबर्या, १० लोकनाट्ये, २४ लघुकथा, १० पोवाडे, एक नाटक आणि प्रवास वर्णन लिहिले. बालविवाह आणि हुंडा प्रथेला विरोध, अंधश्रध्दा निर्मुलन, जातीय भेदभावाला विरोध, श्रमिकांचा संघर्ष याबाबत त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला. त्यांच्या साहित्याचा रशियन, जर्मन, पॉलिश भाषेत अनुवाद झाला.तर महिला, दलित, शोषित, पिडीत यांच्या उध्दारासाठी त्यांनी प्रयत्न केले.थोर साहित्यरत्न,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमीत्त देश हिताच्या कार्याचा गौरव म्हणूनअण्णा भाऊ साठे यांच्या १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल गव्हाणे यांनी शासनाकडे केली आहे.
_______________________

Post a Comment