विष्णूपुरी | गणेश तेलंगे:-लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मडकी येथे लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव बाजीराव पाटील कळकेकर तथा दैनिक लोकनेता विभागीय संपादक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक लोकनेता नांदेड जिल्हा प्रतिनिधी गोविंद पाटील मोरे मडकीकर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी गोविंद पाटील मोरे यांच्या वतीने बाजीराव पाटील कळकेकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापिका पानपटवार मॅडम,नवीन मॅडम, बालाजी नरवडे ,पालक व शाळेतील विद्यार्थीनी ,विद्यार्थी उपस्थित होते.
________________________

Post a Comment