शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना अर्धवट जेवण, प्रशासनाचे दुर्लक्ष

 

लोकनेता न्युज नेटवर्क


            
नायगाव माधव बैलकवाड:–नायगाव येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार जेवण न देता अर्धवट जेवण दिल्यामुळे उपाशीपोटी राहिलेल्या विद्यार्थ्यांनी अधीक्षकाकडे व्यथा मांडले,अधीक्षकाने मेसच्या ठेकेदाराकडे तक्रार केली असताना ठेकेदाराने अरेरावेची भाषा केली व माझे कोणी काही करू शकत नाही असे म्हणताच विद्यार्थ्यांना पत्रकारांनी विचारणा केले असता विद्यार्थी म्हणाले की आम्हाला शासनाच्या नियमानुसार कसल्याच प्रकारची सुविधा या ठिकाणी प्राप्त होत नसून जेवण नाश्ता अर्धवट देण्यात येत आहेत पिण्याचे पाणी बरोबर मिळत नसून कपडे धुण्यासाठी वाशिंग मशीन शासनाने दिलेले ती बंद पडल्यामुळे सर्व कपडे विद्यार्थ्यांना अभ्यास न करता धुण्यासाठी जावे लागते तसेच विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून व्यायाम करण्यासाठी आलेले साहित्य धुळखात पडल्यामुळे विद्यार्थी व्यायामापासून देखील दुर होत असल्यामुळे विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अशी एकंदरीत विद्यार्थ्यांनी व्यथा मांडली. विद्यार्थ्यां मध्ये तीव्र संताप व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी नायगाव तहसील कार्यालय समोर ठिय्या मांडला होता त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. दिसुन आले शासन गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करत अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने वस्तीगृह बांधण्यात आले परंतु शुक्राचार्य सारखे अधिकारी ठेकेदार व यांच्या संगममताने विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार सुविधा प्राप्त करून द्यावयाच्या ऐवजी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण अर्धवट दिल्यामुळे विद्यार्थी उपाशीपोटी नायगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात आपल्या वेठेचा बाजार मांडला होता परंतु याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे लक्ष न दिल्यामुळे लोकप्रतिनिधी व समाज कल्याण विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी होत असून विद्यार्थी व पालकातून तीव्र नाराजी करण्यात येत आहे.
________________________

0/Post a Comment/Comments