लोकनेता न्युज नेटवर्क
पेठवडजlअशोक पाटील तेलंग:–या शैक्षणिक वर्षात परफेक्ट इंग्लिश स्कूल, पेठवडज येथील विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्ही महत्त्वपूर्ण परीक्षांमध्ये लक्षणीय यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या शाळेच्या प्रयत्नांना या यशाने नवसंजीवनी मिळाली आहे.
नवोदय विद्यालय शंकरनगर येथे इयत्ता नववी साठी तिसऱ्या निवड यादीत शैलेश नामदेव दामले, गायत्री प्रताप देशमुख आणि युवराज व्यंकटराव पवळे या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यासोबतच यावर्षी एकूण १५ विद्यार्थ्यांनी नवोदयसाठी पात्रता मिळवली असून त्यामध्ये इयत्ता पाचवीतील पाच आणि आठवीतील दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आजपर्यंत शाळेतील एकूण १०९ विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवडले गेले असून ही शाळेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतही जबरदस्त कामगिरी करत एकूण ६३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. त्यामध्ये इयत्ता पाचवीतील २६ आणि आठवीतील ३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यामधील तीन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. आजपर्यंत एकूण ४१७ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले असून हे शाळेच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचे फलित आहे.
या यशामागे शाळेचे कुशल मार्गदर्शन, शिक्षकांचे अथक परिश्रम, विद्यार्थ्यांची चिकाटी आणि पालकांचे मोलाचे सहकार्य आहे. परफेक्ट इंग्लिश स्कूलने शिक्षणाच्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते खर्या अर्थाने प्रेरणादायी आहे. शाळेच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गिरीधारी केंद्रे सर सचिव गोविंद केंद्रे सर मुख्याध्यापिका पवार मॅडम आणि पांचाळ मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अभिनंदन केले आहे
________________________

Post a Comment