लोकनेता न्युज नेटवर्क
सेनगावlमहादेव हारण:-महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे या संस्थेच्या दि.२७ जुलै रविवार रोजी संपन्न झालेल्या बैठकीत सर्वानुमते हिंगोली नगरपरीषदेचे माजी मुख्याधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड झाली असुन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेशजी आवटे व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर(बाबासाहेब)होनराव यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.या निवडीबद्दल सुमठाणकर यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
रामदास पाटील सुमठाणकर हे हिंगोली नगरपरीषदेचे मुख्याधिकारी असतांना हिंगोली शहरात त्यांच्या काळात कोट्यावधी रुपयाचा विकास झाला यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक तसेच समाजकार्य,सामाजिक कार्य बांधिलकी व समाज हिताची तळमळ हि आदर्शवत आहेत या सत्कार्याची दखल घेत महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे या संस्थेने सुमठाणकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
माझ्या सारख्या तरुण,समाजासाठी समर्पीत कार्यकर्त्याला संधी मिळणे हे मी माझ भाग्य समजतो:-रामदास पाटील सुमठाणकर
महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचे पुनर्जीवन करणे,ग्रामपातळीवर शाखा स्थापन करुन समाज संघटीत करणे समाजातील मग महामंडळ असो की,स्मारकाचा विषय असो की जिल्हास्तरीय वसतीगृह असो,रुद्र भुमी मुक्ती मोहीम असो की,स्पर्धा परीक्षा केंद्र अशा अनेक सामाजिक राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात समाजाच्या उत्कर्षसाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे रामदास पाटील सुमठाणकर बोलतानी सांगितले.
________________________

Post a Comment