लोकनेता न्युज नेटवर्क
वाघोलीlसंतोष कदम:–मंगळागौर ही स्पर्धा म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची मेजवानीच ठरली.
खराडी-चंदननगर परिसरात मंगळागौर उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात, पारंपरिक थाटात आणि सामाजिक एकोप्यासह साजरा करण्यात आला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत विविध खेळ, फुगड्या, झिम्मा, आणि पारंपरिक गाणी-नृत्यांच्या स्पर्धा सादर केल्या. या उत्सवात परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन
शिरूर तालुका मित्र परिवार, पुणे
"आम्ही सावित्रीच्या लेकी" ग्रुप
"आपलं खराडी-चंदननगर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे सौ. तेजश्री ताई बाळा पऱ्हाड, संस्थापिका – "आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुप", यांचे अथक परिश्रम व नेतृत्व होते.
तसेच, बाळा पऱ्हाड, संस्थापक अध्यक्ष – शिरूर तालुका मित्र परिवार, पुणे, यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले.
या मंगळागौर उत्सवामुळे खराडी-चंदननगर परिसरात सांस्कृतिक जाणीव,आपल्या पारंपारिक रूढी-परंपरा,स्त्रीशक्तीचा गौरव आणि समूहभावनेचा प्रेरणादायी संदेश रुजवला गेला.
यशस्वी महिला उद्योजिका पुरस्कार २०२५
ने या कार्यक्रमात गौरवण्यात आले
सौ.पूनम ताई शिराळ
(मोरपंख साडीज् )
सौ. शितलताई गरड
(गरड मटण खाणावळ)
सौ. हर्षलीताई कोलते
(HETUKA INTERIOR)
या महिलांचा सन्मान करण्यात आला._
_______________________

Post a Comment