लोकनेता न्युज नेटवर्क
येलूर | प्रतिनिधी:- एका साध्या घरातून आलेला माणूस, जेव्हा आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण समाजाच्या हृदयात स्थान निर्माण करतो, तेव्हा त्याला नेता म्हणण्याऐवजी समाजाचा आधारस्तंभ म्हणावेसे वाटते. ज्ञानेश्वर पाटील शिंदे हे असेच एक नाव आहे, जे आज आपल्या कार्यामुळे जनतेच्या काळजाच आहेत. ना श्रीमंतीची पार्श्वभूमी, ना कुठलीही राजकीय परंपरा, तरीही केवळ सेवाभावी वृत्ती आणि प्रामाणिक इच्छाशक्तीच्या जोरावर जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्ञानेश्वर पाटील शिंदे. लहानपणापासूनच नीतिमताने वागलेले एक सत्य निर्भीड नेतृत्व खरं ते खरं खोटं ते खोटं सत्यासाठी लढणारे नेहमीच सामान्य जनतेच्या वेदना, त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा यांना आपले समजून त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आले आहेत. त्यांनी कधीही
मोठेपणाचा बडेजाव केला नाही, ना राजकारणाचा देखावा केला. जनतेमध्ये मिसळून, त्यांच्या घरादारात जाऊन, त्यांच्या प्रश्नांना समजून घेणं आणि त्यावर तत्काळ उपाय शोधणं, हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.
आजच्या काळात जेव्हा बहुतेक लोक सत्ता, प्रसिद्धी किंवा नुसत्या भाषणांपुरतेच मर्यादित राहतात, तेव्हा ज्ञानेश्वर पाटील शिंदे हे त्याला अपवाद ठरतात. कारण ते भाषण देण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात. त्यांचा प्रत्येक दिवस हा जनतेतेच्या सेवे साठी वाहिलेला असतो. गावातला व आपल्या परिसरातील कुठलाही विषय असलं अनेक समस्यांवर रोखठोक बोलणारं नेतृत्व जर कुठे एखाद्या विद्यार्थ्याला शालेय साहित्याची गरज असेल, कुठे एखाद्या वृद्धास औषधांचा प्रश्न असेल समाज सेवेची आवड असनारे ज्ञानेश्वर पाटील शिंदे हे प्रत्येक ठिकाणी स्वतः हजर राहून त्या समस्येचा भाग होतात. सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे हास्य निर्माण करणं, हेच
त्यांचं खरे यश आहे असं ते नेहमी सांगतात. राजकारण हे त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचं साधन नाही, तर समाजसेवेचं एक साधन आहे अशी त्यांची ठाम धोरण आहे. म्हणूनच, अगदी थोड्याच काळात त्यांनी आपल्या कृतीतून लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ज्ञानेश्वर पाटील शिंदे यांचं आयुष्य हे अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आज जेव्हा लोक नेता निवडतात, तेव्हा त्यांना केवळ बोलणारा नव्हे तर कृती करणारा नेता हवा असतो. आणि अशा सच्च्या, मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा शोध घेतला, तर ज्ञानेश्वर पाटील शिंदे हे नाव नक्कीच आपल्या येलुर मधुन पुढे येईल. त्यांची वाटचाल अजूनही सुरू आहे हक्क, न्याय आणि सेवा या त्रिसूत्रीवर आधारलेली. त्यांच्या डोळ्यांत असलेली जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची चमक, आजही तितकीच तेजस्वी आहे. ज्ञानेश्वर पाटील शिंदे हे नाव आज केवळ व्यक्तीपुरते मर्यादित राहिलं नाही, तर ते एक चळवळ बनलं आहे सामान्यांचे प्रश्न सोडवणारी, दमदार नेतृत्व आपल्या गावातील अनेक अडीअडचणी असतील ते ठामपणे पुढे जाऊन रोखठोक भूमिकेत सोडतात ज्ञानेश्वर पाटील तुमच्या कार्याला सलाम शिवराज सुभाषराव माली पाटील आकरगे
________________________

Post a Comment