अहमदपूर|तानाजी मालकवाड:- लातूर जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक (SP) सन्मानिय अमोल तांबे साहेब यांनी अहमदपूर तालुक्यातील जाज्वल्य असलेल्या मौजे परचंडा येथील रोकडोबाचे आरती करून दर्शन घेतले.IPS असलेल्या तांबे साहेब यांचा देवस्थान कमिटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, डीवायएसपी मणिष कल्याणकर उपस्थित होते.
यावेळी सरपंच शिवशंकर हिप्परगे,नवनाथ जाधव, संगम कापसे यांच्या सह परचंडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________

Post a Comment