प्रश्न विचारला असता गुत्तेदाराणे तेथून पळ काढला
सिंदखेड राजा :- तालुक्यातील सावखेड तेजन गावामध्ये मराठी शाळेच्या समोर सिमेंट रस्त्याचे काम चालू असताना शाकीय अभियांत्रिकी परिपत्रक याप्रमाणे सिमेंट व खडी रेती यांचे प्रमाण नियमावलीनुसार नव्हते. हा सगळा प्रकार घडत असताना सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकून हा कारभार सुरू होता. मात्र संबंधित गैरप्रकाराबाबत तेथे उपस्थित असणाऱ्या गुत्तेदाराला प्रश्न विचारला असता तेथून गुत्तेदाराने पळ काढावा. संबंधित सिमेंट रस्त्याचे काम अतिशय ढिसाळ केले असून संबंधित रस्ता काही महिने तर सोडा काही दिवस सुध्दा टिकणार नाही अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. संबंधित कामाची तपासणी व्हावी व रस्ता पुनःश्च एकदा दर्जेदार बनवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
________________________

Post a Comment