लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा :- देशातील पहिल्याच विधिज्ञ साहित्य संमेलनाच्या छत्रपती संभाजीनगर येथे दि. २६-०७-२०२५ रोजी आयोजित सोहळ्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मां जिजाऊंची माहेर नगरी असलेल्या सिंदखेडराजा येथील विधिज्ञ तथा कवयित्री वर्षा कंकाळ यांच्या कवितेची निवड होऊन त्यांना निमंत्रित करण्यात आल्या प्रित्यर्थ आज दि. १६-०७-२०२५ रोजी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधिज्ञ तथा सामाजिक कार्य व साहित्यिक योगदानासाठी अंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त बहुजन साहित्य संघ, चिखली चे अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे तसेच ज्येष्ठ साहित्यिक तथा परकायाप्रवेशी शैली संपन्न कथाकार व ब. सा. सं. चे उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने, केंद्रीय मानवाधिकार संगठन चे बुलढाणा जिल्हा पदाधिकारी तथा ज्येष्ठ संपादक कवी रमेश खंडारे, बालकवी अंकुश पडघान, सिंदखेडराजा वकील संघाचे सन्माननीय सदस्य विधिज्ञ मंगळवेढे, ठोसरे, चव्हाण, शेख, शेळके, साळवे, पठाण तथा इतर अनेक मान्यवर विधिज्ञ मंडळीसह सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गवई, युवा कार्यकर्ती शिवानी मोरे यांच्या सह बऱ्याच उपस्थितांनी वर्षा कंकाळ यांचे सिंदखेडराजा वकील संघाचे सचिव मा. पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मधे पुष्पगुच्छासह शुभेच्छा देऊन वकील संघ कार्यालयात हार्दिक अभिनंदन केले.
________________________

Post a Comment