लोकनेता न्युज नेटवर्क
बारामतीlबबनराव धायतोंडे:-बारामती तालुक्यातील काटेवाडी जवळ बारामती-इंदापूर बसमध्ये एका माथेफिरूने एका युवकावर कोयत्याने हल्ला केला.त्यानंतर त्याने स्वतःवरही कोयत्याने वार करून घेतले,मात्र या धक्कादायक घटनेत अचानक समोरचे दृश्य पाहून धक्का बसलेल्या इंदापूर तालुक्यातील मूळच्या काटी गावच्या महिला प्रवाशाचा हकनाक जीव गेला. काहीही दोष नसताना एक कुटुंब उघड्यावर आले.
वर्षा रामचंद्र भोसले असे या विवाहित महिलेचे नाव असून त्यांच्यावर काटेवाडी येथील घडलेल्या घटनेपासून पुण्यात उपचार सुरू होते.काटेवाडीत ३१ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. बारामतीतून काटेवाडीकडे निघालेल्या या बसमध्ये वर्षा रामचंद्र भोसले यादेखील होत्या.दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत अचानक झालेल्या हल्ला प्रकरणात बसमध्ये घडलेले दृश्य पाहून वर्षा भोसले यांना मोठा धक्का बसला.त्या संपूर्ण प्रकार पाहून भीतीने खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला.
त्यांना बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र तिथे त्यांची प्रकृती तपासल्यानंतर त्यांना पुण्यातील खाजगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
______________________

Post a Comment