लोकनेता न्युज नेटवर्क
किशनराव गायकवाड|उमरी - येथे दिनांक 22 ऑगस्ट रोजी मॉडर्न इंग्लिश स्कूल मधे “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र " या नगर विकास विभागाच्या 1 कोटी वृक्षारोपण करण्याच्या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. नगर परिषदेच्या वतीने शाळेला 50 झाडे उपलब्ध करून देण्यात आली होती. ह्यावेळी उमरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सतिश दर्शनवाड, सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी नंदकुमार कुलकर्णी, शिक्षण विस्तार अधिकारी शंकर बेळकोने, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका अनुराधा कुलकर्णी, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शाळेतील सहशिक्षक आणि विद्यार्थी यांनी उत्साहाने यात सहभाग घेतला .
आज एकाच दिवशी महाराष्ट्रात एकूण 90,000 वृक्ष एकाच दिवशी लावण्यात आले. उमरी नगर परिषद परिसरासाठी 6000 रोपांच्या वृक्षारोपणाचे उद्दिष्ट होते. ह्यामधे मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या स्टाफ आणि विद्यार्थांनी सहभाग नोंदविला.
________________________
.jpg)
Post a Comment