लोकनेता न्युज नेटवर्क
बारुळ | जाधव :- कंधार तालुक्यात दिनांक २७ व २८ ऑगस्ट रोजीच्या ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर शेतजमिनीचे व घराचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना घर सोडून इतर ठिकाणी सहारा घ्यावा लागला या भयावह परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अतुलजी साळवे हे दिनांक ३० रोजी कवठा येथे येऊन आपत्तीची पाहणी केली .त्यावेळी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी करणारे निवेदन कंधार (दक्षिण) भाजपा अध्यक्ष एड. विजय धोंडगे यांनी एका निवेदनाद्वारे केली . त्या निवेदनात म्हटले आहे की,दिनांक २८ रोजी कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात शेतकऱ्यांची जनावरे ,शेड, शेतजमीन खरडून गेली आहे. त्यात कवठा ,शिरूर ,चौकी धर्मापुरी ,चौकी महाकाया ,तेलूर, काटकळंबा, धानोरा, राऊत खेडा, चिखली, सावळेश्वर, नंदनवन, आवराळ ,बारूळ, चिंचोली ,बाचोटी ,गोगदरी ,मंगल सांगवी ,वरवंट, कवठावाडी, पानशेवडी ,जंगमवाडी ,उंब्रज, पाताळगंगा ही गावे जास्तीची प्रभावी झाली आहेत .
यावेळी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे ,भाजपा कंधारचे अध्यक्ष गंगाप्रसाद यनावार ,लोहा भाजपा अध्यक्ष शरद पाटील पवार ,भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी उपसभापती सदाशिव अंभोरे, शिवसांब देशमुख ,भास्कर पाटील जोमेगावकर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
________________________
Post a Comment