सरपंच सौ शितल आरबड यांनी घेतला पुढाकार
गेवराई|ज्ञानेश्वर उदावंत :- गेवराई तालुक्यातील मौजे माटेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शितल ज्ञानेश्वर आरबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माटेगाव येथे दारु विक्री व दारुबंदी करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे परिसरात स्वागत करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माटेगाव येथे जि.प.शाळा, मंदिर व बसस्थानक परिसरात अवैध दारू विक्रीमुळे लोक व्यसनाधीन होऊन सार्वजनिक शांतता भंग होत असुन शाळेतील मुला-मुलींना व महिलांना त्रास होत असल्यामुळे दारुबंदीसाठी सरपंच सौ. शितल ज्ञानेश्वर आरबड यांनी पुढाकार घेतला. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सरपंच सौ. शितल आरबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव घेण्यात आला. यावेळी शरद आश्राजी शिंदे यांनी सभेत विषय मांडला की, मौजे माटेगाव मध्ये व परिसरात अवैध दारू विक्री गावातील शाळा, मंदिर व बसस्थानक या परीसरात होत असल्यामुळे शाळेतील मुला मुलींना व गावातील महिलांना यामुळे त्रास होत आहे. तसेच अवैध दारू विक्री व मद्यपानामुळे लोक व्यसनाधीन होऊन गावामध्ये खालील समस्या निर्माण झाल्या आहेत आहेत. गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद झाल्यास मद्यपाणामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतील. यावर उपस्थित सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामस्थ यांच्यात सविस्तर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी सरपंच सौ शितल आरबड, उपसरपंच सौ. गिता शहादेव यादव, ज्ञानेश्वर आरबड, ग्रामसेवक पी.आर. घाडगे यांच्यासह सर्व ग्रामपंचात सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायतच्या वतीने दारुबंदी ठराव व निवेदन चकलंबा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना देण्यात आले असून माटेगाव ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे परिसरात स्वागत केले जात आहे. यावेळी महादेव कर्डिले भागवत जंगले, योगेश गावडे, अजय टेकाळे, अभिजीत चव्हाण, अर्जुन घाडगे, हकिम शेख, सचिन जाधव दादासाहेब यादव,विक्रम गरुड, गोविंदराव चहाण, सुरेश कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________

Post a Comment