लोकनेता न्युज नेटवर्क
भोकर | बाजीराव पाटील :- सराफा लेन, भोकर येथील लोकमान्य टिळक गणेश मंडळाच्या गणरायाचे आज दर्शन घेतले. याच गणेश मंडपात मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १२५ वा भाग पाहिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी देशाच्या अनेक भागांतील पूरस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि या नैसर्गिक आपत्तीत प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त केली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत थोड्या फरकाने संधी गमावणाऱ्या प्रतिभावान परीक्षार्थींना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘प्रतिभा सेतू’ या पोर्टलची माहिती त्यांनी आजच्या कार्यक्रमात दिली. येत्या १७ सप्टेंबरला हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन असून, त्यानिमित्ताने हैद्राबाद संस्थानातील अत्याचारांविषयी सरदार वल्लभभाई पटेल यांची एक ध्वनीफीत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज ऐकवली.
गणेशोत्सव तसेच आगामी काळातील विविध सण-उत्सवांमध्ये स्वदेशी सजावट आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करून आत्मनिर्भर व विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
________________________
Post a Comment