नांदेड :- राज्यातील अनुसूचित जातीतील 59 जातींना विभागून तातडीने अबकड आरक्षणाचा प्रश्न सोडवावा परंतु मागासवर्गीयाना क्रिमिलियरची अट लावू नये अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुजन शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय रणखांब यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने देशातील अनुसूचित जातीत अबकड आरक्षण करण्याचा निर्णय दिलेला आहे .आणि त्यानुसार देशातील अनेक राज्यांनी अनुसूचित जातीत अबकड आरक्षण लागू केलेले आहे. इतर राज्यात व महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे अबकड आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. राज्यात अनेक दिवसापासून अबकड आरक्षणाचे आयोगाची स्थापना करण्यात आली आहे .परंतु आयोगाने अजूनही अहवाल दिलेला नाही .त्यामुळे अ ब कड आरक्षणाचं प्रक्रिया प्रलंबित असून त्यावर शासनाने अजून निर्णय घेतलेला नाही. शासनाने अबकड आरक्षण लागू न केल्यामुळे समाजामध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत.शासनाने तातडीने आयोगाकडून अहवाल मागून घेऊन राज्यातील अनुसूचित जातीतील अबकड तातडीने लागू करावे. परंतु मागासवर्गीयाना क्रिमिलियरची अट लावू नये अन्यथा मागासवर्गीयांना अबकड आरक्षण देऊन काही फायदा होणार नाही. म्हणून क्रीमियरची अट लावू नये.
राज्यातील मातंग समाज हा अजूनही विकासापासून कोसो दूर आहे समाजातील शैक्षणिक सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्वच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रात अनुशेष बाकी आहे .आणि राज्यातील मागासवर्गीयांचे कर्मचारी अधिकारी यांचे शासकीय प्रशासकीय लाखो कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त असून शासनाने अबकड आरक्षण लागू करून त्यानंतरच नोकर भरती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करत आहोत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये म्हटले आहे की या देशात स्वातंत्र्य, समता बंधुता सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. आणि संधीची समानता म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ झोपडीतील माणसापर्यंत गेला पाहिजे हा उद्देश ठेवून बाबासाहेबांनी संविधाच्या उद्देश पत्रिकेत उल्लेख आहे. त्याप्रमाणे शासनाने सुद्धा संविधानाच्या उद्देश पत्रिकेप्रमाणे शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण मिळाले पाहिजे. आणि संधीची समानता सर्व समाजामध्ये आणण्यासाठी व मातंग समाजाला संधीची समानता दिली पाहिजे . सामाजिक न्याय, सामाजिक हक्क ,सामाजिक अधिकार, मिळाला पाहिजे.अशी मागणी बहुजन शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय रणखांब यांनी केली आहे. .
________________________

Post a Comment