लोहा|संतोष पाटील जाधव :- तालुक्यातील पिंपळदरी येथे ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून संपूर्ण शेतामध्ये पाच फूट पाणी वाहत आहे.पिके वाहून गेले आहेत . गावातील प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरले असून शेतातील पिके ही गेले व घरात पाणी शिरल्याने संसार उद्धवस्त झाले आहेत.एक शेतकरी टाहो फोडून देवाच्या नावाने हाका मारीत आहे.पिंपळदरी येथील गावकरी हैराण झाले आहेत गावाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.तरी शासनाने ताबडतोब पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.
________________________

Post a Comment