31 ऑगस्टला ह भ प सोपानमहाराज केनेकर किर्तन
लोकनेता न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :- तुकून राऊत लेआउट येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव शनिवारी दिनांक 27 ऑगस्ट 2025 दिनांक 8 सप्टेंबर या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे 27 ऑगस्टला स्थापना 28 ऑगस्टला महाआरती 29 ऑगस्टला दुपारी भजन कीर्तन तसेच 1 सप्टेंबर ला खेळ पैठणीचा होम मिनिस्टर महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने तेरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दरवर्षी प्रमाणे यंदा हिंदवी स्वराज्य गणेश मंडळांनी चंद्रपुरात आकर्षित विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमाला चंद्रपूर शहरातील संपूर्ण जनता उपस्थित राहण्याची शक्यता आहे विशेष आकर्षण महाराष्ट्रातील नामवंत गाजलेले कीर्तनकार ह भ प सोपान महाराज केनेकर यांचा 31 ऑगस्टला भव्य दिव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पन्नास हजार एक स्टोन पासुन बनवलेली गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती हिंदवी स्वराज्य गणेश मंडळांनी यावर्षी बसवलेली आहे. हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाचे हे दुसरे वर्ष असून दुसऱ्या वर्षात प्रदान करत असताना अतिशय मोठ्या उत्साहाने आमच्या मंडळाने तयारी केलेली आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे व 31 ऑगस्टला ह भ प सोपान महाराज केनेकर यांचे प्रबोधनात्मक किर्तन ठेवण्यात आलेले आहे
- मयूर भोकरे
आयोजक हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ
________________________

Post a Comment