महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन शाखा देगलूर संघटनेचे मागणी
लोकनेता न्युज नेटवर्क
देगलूर | लक्ष्मी मनधरणे :- तालुका अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना मागील ५ वर्षापासून रखडलेला तालुका गुरूगौरव पुरस्कार येत्या ५.०९.२०२५ रोजी प्रदान करावा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा देगलूर च्या वतीने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देगलूर यांना आज दिनांक २२.०८.२०२५ रोजी देण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी “गुरुगौरव पुरस्कार” देण्यात यावा, अशी जोरदार मागणी संघटनेकडून करण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या घडणीत योगदान तसेच समाजाभिमुख उपक्रम हाती घेतलेल्या शिक्षकांचा गौरव झाला पाहिजे, असे मत संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल पांगरे यांनी व्यक्त केले.
शिक्षकांना “गुरुगौरव पुरस्कार” प्रदान करून त्यांचा सन्मान करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे शिक्षकवर्गामध्ये प्रेरणा निर्माण होईल तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठलरेड्डी पांगरे
संदीप शिंदे सचिव अनिल दुगाने, नामदेव बिरादार केंद्राध्यक्ष ,
राघवेंद्र काळे केंद्राध्यक्ष
गजानन कौठकर केंद्राध्यक्ष
आनंद हळदे केंद्राध्यक्ष आदी उपस्थित होते.
________________________
Post a Comment