मोगलाजी शिरसेटवार, कैलास येसगेंसह काँग्रेस पक्षाच्या टीमने केली पूरग्रस्त गावांची पाहणी
देगलूर | लक्ष्मी मनधरणे :- कालपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे देगलूर तालुक्यातील शेतीची व खरीप पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. निजामसागर व लेंडी प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गामुळे देगलूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा घातला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर, शेख मीरामोद्दीन, कैलास मुद्दमवार एकनाथ टेकाळे डॉ. मिलिंद शिकारे, एडवोकेट कापसे यांनी तमलूर, मेदनकल्लूर, शेकापूर, शेळगाव या गावांना भेटी देऊन तेथील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे गावातील लोकांना देगलूर येथील सुस्थळी हलविण्यासाठी मोगलाजी शिरशेटवार यांनी वाहनांची सोय लावून दिली.
यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर यांनी झालेल्या नुकसानीची सरकारने तात्काळ दखल घेऊन देगलूर सह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव अशी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली.
________________________

Post a Comment