लोकनेता न्युज नेटवर्क
देगलुर :- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावातील नागरिकांवर पूरपरिस्थितीमुळे शोककळा पसरली. संपूर्ण गाव उध्वस्त झाले. सामाजिक दायित्व व बांधिलकी लक्षात ठेवून परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या विस्तार सेवाकार्य विभागांतर्गत हसनाळ या गावातील लोकांना धान्याच्या स्वरूपात मदत करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने अर्धा किलो गहू व शिक्षकांनी पाच किलो गहू एकत्रित करून 200 किलो धान्याचे वाटप हसनाळ या गावात जाऊन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षकांनी पूर परिस्थितीमुळे उध्वस्त झालेल्या हसणाळ गावाला प्रत्यक्ष भेट देऊन गावाचे विदारक चित्र अनुभवले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माधव जोशी, ज्येष्ठ शिक्षक सुरेश कुलकर्णी, योगेश वझलवार, सुजित मुगुटकर, विस्तार सेवाकार्य विभागाचे प्रमुख मिलिंद जोशी, विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक व हसनाळ गावचे रहिवासी सीआरपीएफ जवान प्रतापराव इंगोले, शिवाजीराव इंगोले, माजी विद्यार्थी चि. सच्चिदानंद इंगोले, चि. चैतन्य इंगोले, वाहन चालक तथा परिवहन समितीचे सदस्य साईनाथ बल्लूरकर उपस्थित होते.
________________________
.jpg)
Post a Comment